प्र चा प्रवास.... फिनलैंड शिक्षण परिषद,आत्मपरिक्षण आणि शाळा भेट
मी आज लवकर उठायचं म्हणून आदल्या रात्री लवकर झोपले होते. पण गजराच्या आधीच,पहाटे ४.१५ वाजताच जाग आली. खिडकीबाहेर पाहिलं… आणि सूर्योदय होत होता!
पाच-दहा मिनिटांतच हॉटेलच्या खिडकीतून इतका लख्ख उजेड आत यायला लागला की क्षणभर वाटलं—अलार्मची गरजच काय होती? निसर्गानेच आपल्याला “गुड मॉर्निंग!” म्हणायची जबाबदारी घेतली होती! सगळी रूम प्रकाशाने भरून गेली होती.
आज स्टडी टूरचा पहिलाच दिवस होता त्यामुळे मनात उत्सुकता आणि भरपूर कुतूहल सगळंच एकत्र भरलेले होतं.
आवरून नाश्त्याला पोहोचलो आणि तिथे शिक्षण क्षेत्रात, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करणारे, महाराष्ट्रातून ह्या शिक्षण परिषदेसाठी आलेले सहभागी भेटले. ओळखी करत, गप्पा मारत, भरपेट नाश्ता करून आम्ही एका प्रायमरी शाळेतील [ १ ते ९ वि पर्यंत] कामकाज प्रत्यक्ष पाहायला निघालो.
आमचा परिषदेच्या अंतर्गत ठरलेल्या सर्व ठिकाणी जायचा प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीने होता. फिनलैंडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट शिस्तबद्ध आणि सोयीचं आहे ह्याची प्रचिती माझ्यासारखीच, बाकीच्यांना ही लगेचच आली.
आपल्या इथल्या कस 'बस आली तर आली' असे बर्याच ठिकाणी असत …त्यामुळे दिलेल्या वेळेवर वैगरे जर बस आली तर अजूबाच म्हणायला हवा '.

![]() |
| चालता चालता एक सेल्फी तो बनता है...अर्थातच सेल्फी हि पब्लिक डिमांड होती!! |
माझ्या बाकीच्या सहभागी शिक्षकांना नमूद केलेल्या वेळेवर येणार्या ट्राम बघून वेगळे आणि सुखद वाटत होते....
सार्वजनिक वाहतूक सुविधा वारंवार आणि वेळेवर असल्यामुळे टू-व्हिलर अगदी कमी आणि ज्या दिसत होत्या त्या delivery साठीच्या! चालणार्याना, सायकलवाल्यांना यूरोपमध्ये असते तसे इथेही प्राधान्य दिलं जातं...
![]() |
| सर्व सिग्नलला आमचा संपूर्ण ग्रुप अतिशय आज्ञाधारकपणे रस्ता ओलांडण्यासाठी वाट बघायचा |
आम्हाला CCE ने पाच दिवसांचं तिकीट, आयकार्ड आणि परिषदेचे शेड्यूल दिल. त्याबरोबर शिरीनने प्रेमळ पण महत्वाची सूचना ही दिली — “ हा पास ५ दिवस दररोज, नेहमी बरोब्बर ठेवायचा आणि रस्ता फक्त हिरवा सिग्नल लागल्यावरच क्रॉस करायचा. भारतात असलेली जिथे जायचे तिथे घुसायचे ही सवय जरा बाजूला ठेवायची ”
आता हे ऐकल्यावर काहींना मनातल्या मनात भारतातला, “गाडी दूर आहे… पळा पटकन!” हा स्वतःचा आत्मविश्वास आठवला —
तिथे मात्र नियम म्हणजे नियम. आणि महत्वाचे म्हणजे कोणी बघत नसतानाही लोक ते पाळतात!
तर आम्ही गप्पा मारत Ruusutorpan Koulu ह्या एस्पो शहरातल्या मोठ्या सरकारी शाळेत पोहोचलो.

| वरच्या बाजूला शाळेचे नाव दिसेल |
![]() |
| शाळेच्या प्रेसेंटेशन हॉल मध्ये आम्ही एकदम आज्ञाधारकपणे बसलो होतो. |
इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतची मुलं ह्या एकाच शाळेत शिकतात. जवळपास ७००-७५० विद्यार्थी. शाळेची रचना हाताच्या पाच बोटांसारखी एखाद्या पंजासारखी होती. त्या शाळेत फिरताना तिथली स्वच्छता, सगळीकडे असलेले CC TV Camera.....मुलांची चालता बोलताना ची स्वयं शिस्त.. हे जाणवत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सतत वाटत होती — आणि ती होती की ही 'शाळा' ही केवळ इमारत नाही, तर मुलांना वाढण्यासाठी दिलेली एक मुक्त मोकळी जागा आहे. One big open space!!
जवळपास ४० वेगवेगळ्या मातृभाषांची मुलं तिथे शिकतात. इराण, इराक, स्पेन, भारत, पाकिस्तान … कितीतरी देशांमधून आलेली मुलं. पण शाळेत फिरताना कुठेच “हा वेगळा तो वेगळा ” असं जाणवत नव्हतं. आपल्या इथल्या मुलांविषयीच्या असंख्य प्रश्नांपेक्षा तिथे “हे मूल आनंदाने शिकतंय का?” हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटला.
क्षणभर मनात आलं — आपल्या शाळेत जर मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर काही मुलं “आज आम्ही फक्त PT करणार!” अशी घोषणा करतील बहुतेक आणि तेही दररोज!!
गंमत बाजूला ठेवली तर एक गोष्ट खूप मनाला भिडली — इथे शिक्षकाची भूमिका म्हणजे “जो शिकवतो” एवढीच नाही, तर “शिक्षक तो जो मुलाला शिकायला मदत करतो” A teacher is a great facilitator.....अशी संकल्पना आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते हे त्यांनी अक्षरशः पूर्णपणे स्वीकारलं खर तर त्यांच्या शिक्षणा विषयीच्या दृष्टीकोनात त्यांनी रुजवले आहे.
नव्याने स्थलांतरित झालेल्या मुलांसाठी, तयारी करण्यासाठी Preparatory Classes असतात.
आपल्याकडे अनेकदा “ ह्या मुलाला बाकीच्यांसारखं का नाही येत?” असा प्रश्न विचारला जातो… इथे मात्र “याला शिकायला अजून काय मदत करता येईल?” हा विचार केला जातो असे वाटले.
दोन नववीतल्या आणि दोन सातवीतल्या मुलीनी त्यांच्या शाळेविषयी प्रेझेंटेशन दिलं. त्यांचा आत्मविश्वास बघून सगळेच चकित आणि प्रभावित झाले होते! आमच्या प्रश्नांना त्यांनी इतक्या सहजपणे उत्तरं दिली की क्षणभर वाटलं — आपण व्हायव्हा सारखे प्रश्न विचारतो आहोत खरे...पण ज्यांना परीक्षा ह्या शब्दांची भीतीच नाही अश्या विद्यार्थ्यांना कसली आलीय उत्तरे द्यायची भीती. ...त्या निर्धास्तपणे हसत उत्तरे देत होत्या. कदाचित त्यांच्यासाठी उत्तर देणं म्हणजे बरोबर किवा अचूक उत्तर शोधणं नव्हतं; स्वतःचा विचार उत्तम प्रकाराने व्यक्त करणं होतं.
आम्ही आमच्या गटानुसार शाळेला भेट दिली.
खेळाचे भले मोठे इनडोअर जिम असो किवा होम इकॉनॉमिक किवा गृह शास्त्र विभाग पाहताना तर आम्ही सगळेच भारावून गेलो. मुलं स्वयंपाक करत होती, बेकिंग करत होती, मोजमाप शिकत होती… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम झाल्यावर आवराआवरही स्वतः करत होती!

| चित्र कुठले काढायचे हा निर्णय पूर्णपणे विद्यार्थ्यांचा...! |
![]() |
| विदयार्थ्यांनी रंगवलेल्या चित्रांनी सजवलेला जिना... चित्र-प्रदर्शन नावाचा वेगळा कार्यक्रम नाही! |
![]() |
| होम इकॉनॉमिक्स मधल्या कूकिंगच्या वर्गातली विदयार्थ्यांनी केलेली स्वछता |
आपल्याकडे काही मोठी माणसंही चहाचा कप जागेवर ठेवत नाहीत… तिथे ही मुलं पूर्ण किचन आवरून ठेवत होती! वर्क शॉप मध्ये मुलं ड्रिल मशीन, करवत, इलेक्ट्रॉनिक्स वापरत होती. टेक्स्टटाइल मध्ये शिवणकाम, विणकाम...[ एक ९-१० वर्षाचा मुलगा विणत बसलेला पाहून भरून आला होता मला.....मी त्याला विचारले," काय बनवतो आहेस?" तर म्हणाला,"इथे खूप थंडी असते त्यामुळे एखादा स्टयलिश स्कार्फ बनवतो आहे." ] ह्यासाठी वेगळा वर्ग...मुलगा-मुलगी असा कुठलाही भेद नव्हता.....आपल्याला जे रुचेल तो पर्याय निवडायचा आणि ते शिकायचे. “जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करणे” एवढाच सरळ विचार.
आमच्या गटाला शाळा दाखवणारी शिक्षिका जर्मन शिकवणारी होती. एका वर्गात दोनविद्यार्थी भेटल्यावर,तिने विद्यार्थ्यांकडे बघून “My students…” असं म्हटलं आणि नकळत मन भरून आलं आणि तिच्या बरोबर जोडले गेल्यासारखे वाटले..मीही शाळेतल्या विद्यार्थ्यांबद्दल अगदी असंच बोलते ना — “माझी मुलं…” त्या दोन शब्दात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं दिसलं. त्यात Ownership नव्हती..…अगदी आपल्यासारखाच जिव्हाळा आणि आपुलकी होती.
तिथेच दुपारचे जेवण होते. मुले आपल्या पानात काहीही न टाकता, खरकट काढून टाकून, आपली ताटे धुवायला चमचे वाट्या बाउल असे व्यवस्थित ठेवत होती. छोटी गोष्ट असली तरी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेसाठी किती महत्वाची गोष्ट आहे. तिथून आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाऊन शिक्षण व्यवस्थेतील मूलतत्त्वे त्याबद्दल माहिती घेतली.
या सगळ्या भेटीत सर्वात जास्त काय जाणवलं माहितेय?
इथे शिक्षक सतत स्वतःलाही शिकवत असतात, शिकत असतात.
मूल मागे राहत असेल तर त्याला दोष देण्यापेक्षा “आपली पद्धत बदलायला हवी का?” "ह्यापेक्षा दूसरी कुठली पद्धत वापरल्याने मुलाला जास्त चांगले आणि स्पष्ट कळेल?" हे प्रश्न ते स्वतःला विचारतात. मुलांसाठी वातावरण अधिक चांगलं पोषक कसं करता येईल, अनुभवातून शिकणं अजून समृद्ध कसं होईल, याचा सतत शोध घेत राहतात.
आणि कदाचित म्हणूनच इथले पालक, सरकार शिक्षकांवर इतका विश्वास ठेवतात.शिक्षकाला फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणारा कर्मचारी किवा यत्र न मानता, मुलाच्या शिकण्याच्या प्रवासाचा जाणता साथीदार मानलं जातं.
फिनलंडच्या त्या शाळेतून बाहेर पडताना असं वाटलं —
इथे मुलांना फक्त अभ्यास शिकवला जात नाही…
इथे त्यांना आयुष्य जगायला शिकवलं जातं.
या सगळ्या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... की शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही, तर प्रत्येक मुलाचा शोध घेणं आहे.
शिक्षक म्हणून सतत "हे मूल कसं शिकतं?" हा प्रश्न स्वतःला विचारत राहणं... अध्ययन घटक ठरला की तो त्या त्या वयातील मुलांच्या अनुभवविश्वाशी जोडण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणं... प्रत्येक मुलाची गती, क्षमता आणि गरज ओळखून त्यानुसार स्वतःच्या अध्यापनात बदल करत राहणं... एखादं मूल मागे पडत असेल, तर त्याला दोष न देता "माझ्या प्रयत्नांची दिशा बदलण्याची गरज आहे का?" हा प्रामाणिक आत्मपरीक्षणाचा प्रश्न स्वतःलाच विचारणं... हेच इथल्या शिक्षणाचं खरं सामर्थ्य आहे. कमी जास्त प्रमाणात सर्व चांगले शिक्षक आपल्या इथेही हे करतातच. पण फिनलैंड मध्ये त्या प्रश्नाच्या उत्तरानुसार शिक्षकाला अभ्यासक्रम बदलण्याची स्वायत्तता आहे....स्वातंत्र्य आहे ....आणि मला वाटत त्यामुळे खूप फरक पडतो....
शाळेतून बाहेर पडताना मनात एक वेगळाच विचार दाटून आला... भव्य इमारती, अत्याधुनिक प्रयोगशाळा, तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम किंवा आधुनिक साधनं हे कालानुरूप महत्वाचे आहेच...पण यापेक्षा एका मुलावर, त्याच्यातल्या क्षमतेवर मनापासून विश्वास ठेवणारा शिक्षक हीच कोणत्याही शिक्षणव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद असते.

| ७ वी ,९ वी तल्या विद्यार्थिनी शाळेची माहिती देत असताना आम्ही सगळे तल्लीन होऊन ऐकत होतो. [ विद्यार्थ्यांचे फोटो काढायला परवानगी नाही.] |
त्या दिवशी फक्त एका शाळेला भेट दिली नव्हती...नकळत स्वतःलाच एक प्रश्न विचारत होते—
“आपणही आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असंच शिकण्याचं, फुलण्याचं आणि स्वतःला शोधण्याचं स्वातंत्र्य देतो का?”
मनात एक वेगळीच हुरहूर होती.
सारखी तोतो-चानची, जपानमधली तोमोई गाकुयेन शाळा आठवत राहिली........तिला कोबायाशी-सान भेटले ....
आपल्या इथल्या प्रत्येक मुलाला तसा शिक्षक मिळेल का??? असा शिक्षक जो मुलाला केवळ उत्तरं देणार नाही…
तर योग्य प्रश्न विचारायला शिकवेल, त्यांची उत्तरे शोधून देणार नाही तर उत्तरे कशी शोधायची खरं म्हणजे मिळवायची ह्याचा अनुभव त्यांना स्वतःला उभा करू देईल....जो मुलाला काय विचार करायचा ते सांगणार नाही…
तर स्वतःचा विचार स्वतः करायला शिकवेल.आणि तो विचार स्वतःच्या शब्दांत मांडण्याचं धैर्यही देईल.
वसंत बापट ह्याच्या कवितेतल्या सारखा 'एखादा हरवलेला नचिकेत.... भेटलाच तर गुरु चे काम फक्त दिशा दाखवण्याचे हे लक्षात ठेवून त्याची वाट त्याला शोधू देण्याचे स्वातंत्र्य आपण मुलांना देऊ शकतो आहोत का?
मग मनात आणखी एक प्रश्न आला जो शिरीन ने नंतर हाच प्रश्न विचारला —
“मला इथून काय घेऊन जाता येईल?”
काही नवीन तंत्रज्ञान?...एखादी नवी पद्धत?....एखादा उपक्रम?
कदाचित हे सगळं! पण त्याहून महत्त्वाचं काहीतरी…मुलांकडे पाहण्याची दृष्टी...... त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची दृष्टी...! त्यांच्या वेगळेपणाला स्वीकारण्याची दृष्टी.... आणि गरज पडली तर स्वतःला बदलण्याची तयारी....
कदाचित…
त्या पहाटे ४.१५ वाजता फिनलंडच्या खिडकीतून आत आलेल्या प्रकाशासोबतच एका नव्या विचाराचीही पहाट झाली होती. आणि त्या दिवशी शाळेतून परतताना माझ्यासोबत फक्त काही छायाचित्रं, आठवणी आणि अनुभव नव्हते… ...एक प्रश्न होता.
एक अस्वस्थ करणारा मनात रुंजी घालणारा आणि कदाचित आयुष्यभर सोबत राहणारा प्रश्न—
“मी माझ्या प्रत्येक मुलाला त्याचं स्वतःचं आकाश देण्यासाठी किवा तयार करण्यासाठी अजून काय करू शकते?”
कदाचित…
त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सुरुवातच त्या दिवशी फिनलंडमध्ये झाली.....

.jpg)

.jpg)

मस्त...👌👌
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteमस्त
ReplyDeleteइथे आल्यावर यामुळेच मला थोडी अस्वस्थता आली आहे. जे करायलाच पाहिजे ते सोडून इतरच सगळं होतंय असं वाटत राहतं
हो ना.....शाळेच्या, अभ्यासक्रमाच्या, उपक्रमांच्या, शासकीय कामांच्या चौकटीत राहून, मुलांच्या मानसिकतेचा विचार करत, त्यांचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यांना स्वतःला विचार करायला शिकवता येणे साध्य करता यायला हवे!!
Deleteमस्त
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteधन्यवाद 🙏
ReplyDelete