Posts

प्र चा प्रवास.... फिनलैंड शिक्षण परिषद,आत्मपरिक्षण आणि शाळा भेट

Image
मी आज लवकर उठायचं म्हणून आदल्या रात्री लवकर झोपले होते. पण गजराच्या आधीच,पहाटे ४.१५ वाजताच जाग आली. खिडकीबाहेर पाहिलं… आणि सूर्योदय होत होता! पाच-दहा मिनिटांतच हॉटेलच्या खिडकीतून इतका लख्ख उजेड आत यायला लागला की क्षणभर वाटलं—अलार्मची गरजच काय होती? निसर्गानेच आपल्याला “गुड मॉर्निंग!” म्हणायची जबाबदारी घेतली होती! सगळी रूम प्रकाशाने भरून गेली होती. आज स्टडी टूरचा पहिलाच दिवस होता त्यामुळे मनात उत्सुकता आणि भरपूर कुतूहल सगळंच एकत्र भरलेले होतं. आवरून नाश्त्याला पोहोचलो आणि  तिथे शिक्षण क्षेत्रात,  वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करणारे, महाराष्ट्रातून ह्या शिक्षण परिषदेसाठी आलेले सहभागी भेटले. ओळखी करत, गप्पा मारत, भरपेट नाश्ता करून आम्ही एका प्रायमरी शाळेतील [ १ ते ९ वि पर्यंत] कामकाज प्रत्यक्ष पाहायला निघालो. आमचा परिषदेच्या अंतर्गत ठरलेल्या सर्व ठिकाणी जायचा प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीने होता. फिनलैंडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट शिस्तबद्ध आणि सोयीचं आहे  ह्याची प्रचिती माझ्यासारखीच, बाकीच्यांना ही लगेचच आली. आपल्या इथल्या कस 'बस आली तर आली' असे बर्‍याच ठिकाणी असत …त्यामुळे दि...

प्र चा प्रवास....

Image
.....तर ९ मे उजाडला आणि माझ्या एकल प्रवासाचा पडदा हळूहळू खाली यायला लागला होता. आता पुढचा प्रवास बऱ्याच जणांबरोबर करायचा होता. आदल्या दिवशी रतीला जिथे Airbnb मध्ये सोडले होते, तिथे तिला घ्यायला मी परत गेले. (तोपर्यंत मी स्वतःला हेलसिंकीची अर्धी लोकल आणि पूर्ण "प्रो ट्रॅव्हलर" समजू लागले होते. 😜) अर्थातच ते Airbnb Helsingin Rautatieasema (म्हणजेच हेलसिंकी सेंट्रल रेल्वे स्टेशन) जवळच होते. या रेल्वे स्टेशनची खासियत म्हणजे त्याची अप्रतिम वास्तू. ते रेल्वे स्टेशन कमी आणि एखाद्या भव्य वास्तुकलेच्या प्रदर्शनातील मानाचा नमुनाच वाटत होते. म्हणूनच त्याबद्दल माहिती हवीच होती. अर्थातच माझा जुना मित्र "गूगलेश्वर" मदतीला धावून आला. 😄 प्रसिद्ध वास्तुविशारद एलियेल सारिनेन यांनी डिझाइन केलेली आणि १९१९ मध्ये सुरू झालेली ही वास्तू Art Nouveau आणि National Romantic शैलीतील जगप्रसिद्ध कलाकृती मानली जाते. मुख्यतः फिन्निश ग्रॅनाइटपासून बांधलेल्या या स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक भलीमोठी कमानीदार खिडकी आहे. तिच्या दोन्ही बाजूंना हातात गोलाकार दिवे धरलेले चार भव्य दगडी पुतळे—Lanter...

प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !!

Image
  प्र चा प्रवास .......कला,कॉफी आणि प्रतीक्षा नवीन अध्यायाची !! हेलसिंकीमधल्या पहिल्याच रात्री स्वतः च्या घरी लागावी तशी गाढ झोप लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम टापटीप आवरून अस्मादिक नाश्त्याला वेळेवर हजर झाले. युरोपमध्ये सगळीकडे कॉल्ड ब्रेकफास्ट असतो हा अनुभव काही नवीन नव्हता. पण AX हॉटेलमध्ये नाश्त्याचा थाट बघून माझ्या मनातला खादाड भारतीय [ खर म्हणजे पक्का चवीने खाणारा पुणेकर] जागा झाला.  पॅनकेक, त्याबरोबर तीन-चार प्रकारचे जॅम, सॅलड, त्यात घालण्यासाठी कच्च्या भाज्यांची फौज, अगदी छोट्या, बारीक तुकड्यांत कापलेलं पनीर, पाच-सहा प्रकारची ड्रेसिंग्ज, चार प्रकारचं चीज, क्रॉसाँ, वेगवेगळे ब्रेड आणि आपले आपण टोस्ट करून घेण्याची सुविधा! आपल्याकडे कसे "घे गं, अजून एखादे घे" म्हणत असतात; कोणीतरी मनापासून वाढत ह्या भावनेनेच चार घास जास्तं जाताना...आणि इथे मशीनच "ब्रेड माझ्या आत टाका आणि स्वतःच पाहिजे तसा आणि पाहिजे तेवढा स्वतःच भाजून घ्या" असं सांगत होतं. स्वावलंबनाचा पहिला धडा नाश्त्यापासूनच! सगळ्यात सुखद धक्का म्हणजे इथे दररोज मटारचे बॉल [तळून ठेवलेले असायचे] आणि छोल...

प्र चा एकल प्रवास....स्वीडनहून फिनलँडला...... ट्युलिप ... ऑडी ...आणि शिक्षकत्व !!

Image
 स्वीडनहून फिनलँडला...... ट्युलिप ... ऑडी ...आणि शिक्षकत्व !! आदल्या दिवशी संध्याकाळी वासा म्युझियममधून लवकर परत आले. मग हॉटेल वर जाऊन नुसतच बसण्यापेक्षा बाहेर फिरून यायचा विचार केला.....म्हटलं आलोच आहोत तर जेवढे बघता येईल तेवढे बघू यात ....अनुभवूया.....हॉटेलसमोरचा रस्ता क्रॉस केल्यावर एक सुंदर पार्क होत. तिथे आधी उगाचच जाऊन आले होते...पण त्याच्या शेजारीच दिसणाऱ्या अगदी ठेंगण्या टेकडी बद्दल “इथून संपूर्ण स्टॉकहोमची vibe कळते …” असं हॉटेल मध्ये कुणीतरी सांगितलं होतं…आणि आपणच कसे काय हिच्याकडे दुर्लक्ष केले?? असा विचार करत....पावलं त्या दिशेने वळली. गारेगार वार्‍याला कापत, झाडांच्या पानांची सळसळ ऐकत, पायर्‍या चढत चढत अवघ्या पंधरा मिनिटांत मी टेकडीवर पोहोचले… आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः हरखून गेले.  विहंगम हा शब्द पुस्तकात वाचून कळला नव्हता तितका त्या क्षणी ते दृश्य बघताना कळला [ शेवटी अनुभव आधारित शिक्षण च मला चांगलेच कळते ] ....जुन्या इमारतींचे लाल, नारंगी, करडे, फिकट क्रीम, जुनाट पांढरा अश्या रंगांचे कितीतरी शेड… मधेच दिसणारी हिरवीगार झाडी....फुलांनी आच्छादलेली झाडे....लांब...