Posts

Showing posts from August, 2026

प्र चा प्रवास.... फिनलैंड शिक्षण परिषद,आत्मपरिक्षण आणि शाळा भेट

Image
मी आज लवकर उठायचं म्हणून आदल्या रात्री लवकर झोपले होते. पण गजराच्या आधीच,पहाटे ४.१५ वाजताच जाग आली. खिडकीबाहेर पाहिलं… आणि सूर्योदय होत होता! पाच-दहा मिनिटांतच हॉटेलच्या खिडकीतून इतका लख्ख उजेड आत यायला लागला की क्षणभर वाटलं—अलार्मची गरजच काय होती? निसर्गानेच आपल्याला “गुड मॉर्निंग!” म्हणायची जबाबदारी घेतली होती! सगळी रूम प्रकाशाने भरून गेली होती. आज स्टडी टूरचा पहिलाच दिवस होता त्यामुळे मनात उत्सुकता आणि भरपूर कुतूहल सगळंच एकत्र भरलेले होतं. आवरून नाश्त्याला पोहोचलो आणि  तिथे शिक्षण क्षेत्रात,  वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करणारे, महाराष्ट्रातून ह्या शिक्षण परिषदेसाठी आलेले सहभागी भेटले. ओळखी करत, गप्पा मारत, भरपेट नाश्ता करून आम्ही एका प्रायमरी शाळेतील [ १ ते ९ वि पर्यंत] कामकाज प्रत्यक्ष पाहायला निघालो. आमचा परिषदेच्या अंतर्गत ठरलेल्या सर्व ठिकाणी जायचा प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीने होता. फिनलैंडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट शिस्तबद्ध आणि सोयीचं आहे  ह्याची प्रचिती माझ्यासारखीच, बाकीच्यांना ही लगेचच आली. आपल्या इथल्या कस 'बस आली तर आली' असे बर्‍याच ठिकाणी असत …त्यामुळे दि...