प्र चा एकल प्रवास.... एकला चलो रे ....

 एकला चलो रे ....

तर अशा रीतीने माझ्या प्रवासाची सुरुवात पुण्याहून मुंबईकडे जाण्यापासून झाली... 
आणि माझा पहिला पर्यटनाचा देश होता स्वीडन आणि त्यामध्ये त्याची राजधानी स्टॉकहोम! “
एवढं फिनलैंडपर्यंत जाणारच आहेस, तर शेजारच्या देशातही थोडं डोकावून ये!” — असा अत्यंत उत्साही [आणि बजेटकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा🙃] सल्ला घरच्यांनी दिला. 😄 मग काय… 
“एकदा घराबाहेर पडलेच आहोत, तर एक देश जास्त बघून येऊ” या भारतीय मानसिकतेने 
 १-२ दिवस स्वीडनमध्ये फिरायचं नियोजनही तयार झालं! मध्यरात्री पहिल्यांदाच मिसिंग लिंकवरून 
जाताना मनात भारीच फिलिंग येत होतं. ह्या मिसिंग लिंकचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतंय हे 
आठवलं आणि मनात म्हटलं — “वा! या मिसिंग लिंक सारखेच आपण पण आता 
international solo traveller category मध्ये प्रवेश करतोय बहुतेक!” 😄 
असीम आणि योगेशच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की मुंबई कधी आली ते कळलंच नाही. 
 आणि वेळेच्या इतक्या आधी विमानतळावर पोहोचलो की विमान कंपनीलाच बहुतेक प्रश्न पडला असेल —
 “इतकी उत्साही प्रवासी कोण?” 😄 मुलाचा थरथरता हात हातातून सोडवताना मात्र 
मनात एकदम धस्स झालं... “ममा, नीट जा… स्वतःची काळजी घे… आणि माझी करू नकोस...” 
एवढंच तो मला घट्ट मिठी मारत म्हणाला… आणि माझ्या मनात लगेच हिंदी सिनेमातलं 
background music सुरू झालं. [क्या करे... हम तो भाई पूरे के पूरे फिल्मी है..! 😄] 
पण त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून मन अगदी भरून आलं... वाटलं — 
“इतका कधी मोठा झालास तू? मला कळलंच नाही...” 
आपण कुठेही गेलो की गर्दीत हरवू नये म्हणून मला शोधणारी तुझी बावरलेली नजर असायची… 
आणि आज तू माझी काळजी घ्यायला लागलास! एवढा मोठा झालास तू!! 😇 
काही क्षण असे असतात ना… जेव्हा वेळ अचानक थांबल्यासारखी वाटते. 
त्या एका मिठीत त्याचं लहानपण, माझं आईपण आणि नकळत बदलत गेलेलं आमचं नातं — 
सगळंच एकदम डोळ्यांसमोर उभं राहिलं. बहुतेक असेच क्षण आपल्याला जाणीव करून देतात — 
की आपण फक्त जगत नाही आहोत… तर मनापासून “जिवंत” आहोत. ❤️
 दोघांना अलविदा करून, भावनांच्या भरात आत गेले आणि लक्षात आलं की check-in चे गेट
 तर अजून ३-३.३० तासांनी सुरू होणार! मग काय… विमानतळावर एका कोपऱ्यात मी 
आणि माझ्या बॅगा असा छोटासा संसार थाटला. त्या वेळेला माझ्या चेहऱ्यावरचं expression 
पाहून security वाल्यांनाही बहुतेक वाटलं असेल — “ही इथेच राहायला आली का?” 😄 
४ वाजता check-in च्या रांगेत उभी राहिले. [इकडे असीम आणि योगेश पुण्याला पोहोचून झोपले सुद्धा!]
 गर्दी इतकी होती की मला क्षणभर वाटलं — “सगळे लोक एकाच विमानाने 
फिनलंडलाच किंवा स्टॉकहोमलाच चाललेत की काय?” 😄 शेवटी ५.१५ ला गेटजवळच्या 
food joint मध्ये सोहा नावाच्या नव्याने ओळख झालेल्या उद्योजिकेसोबत डोसा खाल्ला.
 “तुम्ही एकट्याच चाललायत?” तिने विचारलं. मी म्हटलं, “हो… तशी एकटीच आहे… पण आतापर्यंत माझं confidence आणि anxiety दोघंही सोबत आहेत!” 😄 तिच्याबरोबर छान गप्पा झाल्या. 
अनोळखी माणसांमध्येही कधी कधी सहजपणे जुळणाऱ्या ओळखी, प्रवासाला वेगळंच ऊबदारपण देऊन जातात. त्यानंतर विमानात बसले आणि तब्बल सहा तासांनी Istanbul ला विमान उतरलं. 

अवकाशाला भेदून इंस्तंबूल च्या दिशेने मार्गक्रमण करणारे आमचे हवाई जहाज !


शेजारी अमेरिकेला मुलाकडे निघालेलं गुजराती जोडपं होतं. दोघेही पहिल्यांदाच परदेशी जात होते.
मला इतक्या प्रेमाने ठेपला, सुपारी देत होते की काही वेळाने मला वाटायला लागलं — 
 “मी ह्यांची सहप्रवासी नसून नातेवाईकच आहे की काय?” 😄 “थोडू वधारे लो…” काकूंचा 
आग्रह सुरूच होता. आणि मी मनात विचार करत होते — “Airlines ने जेवण दिलं नाही तरी चालेल… 
भारतीय काकू आहेत ना!” 😄 आपण भारतीय परदेशात गेल्यावर जास्तच भारतीय होतो हेच खरं! 
विमान हवेत तरंगू लागलं आणि मनात गुलजार साहेबांचं गाणं अलगद उमटलं — 
“एक राह रुक गयी तो और जुड़ गयी…में मुड़ा तो साथ साथ राह मूड गयी....हवा के परो पर,मेरा आशियाना.....मुसाफिर हू यारो..…” त्या ओळी जणू माझ्याच प्रवासाचा soundtrack बनल्या होत्या. 
इस्तंबूलला गुजराती काका-काकूंना बाय करून उतरले. थोडी पेंग आलेली, डोकं जड झालेलं… 
म्हणून विमानतळावर निवांत फेरफटका मारला. विमानतळ एकदम सुरेख होतं… 
आणि मुख्य म्हणजे WiFi free होतं! हल्ली foreign trip मध्ये “free WiFi मिळालं” 
ह्याचाच आनंद जास्त होतो 😄 भूक लागली म्हणून शेवटी safest भारतीय निर्णय घेतला — 
McDonald's! कारण बाकीचा मेन्यू काही समजत नव्हता… पण burger and fries हा जगभरातला 
भावनिक आणि पोटातही आधार आहे 😄 
घरी फोन करून सगळ्यांना खुशाली कळवली. त्यानंतर परत गेटजवळ येऊन शांतपणे
 विमानाची वाट बघत बसले. पुढचा प्रवास फक्त साडेतीन तासांचा होता… 
पण त्यात डोकं जाम दुखायला लागलं होतं. acidity पण सुरू झाली होती. समोर 
आलेलं अन्न म्हणजे “जेवण” कमी आणि “medical treatment” जास्त वाटत होतं 😄
 त्या क्षणी फक्त एकच विचार चालू होता — “फिनलंडमध्ये पोहोचेपर्यंत आपण traveller 
राहणार की patient होणार?” 😄 अशा मिश्र भावनांमध्ये शेवटी स्टॉकहोमच्या आरलांडा 
विमानतळावर पोहोचले… आणि तिथल्या थंडगार हवेनं मनापासून कुशीत घेतलं.

स्टॉक होम मधील प्रचंड झोंबणारी थंडी ....

बॅग ढकलत, सामान सावरत आणि मुख्य म्हणजे विचारत विचारत बस स्टॉपपाशी पोहोचले.
 सॅकमध्ये जॅकेट ठेवण्याच्या दूरदर्शीपणाचा सार्थ अभिमान बाळगत ते अंगावर चढवलं…
तरीही वार नाकाला आणि कानाला झोंबत होतच! आणि तेवढ्यात तिथल्या एका स्वीडिश काकूंनी विचारलं — “Where are you from?” “India,” म्हटल्यावर लगेच पुढचा प्रश्न — “Delhi or Mumbai?” 😄
 आणि मग त्यांनी पुढच्या १५ मिनिटात त्यांनी बसची ट्रेनची माहितीही दिली.
 "काही नाही ग, ट्रेन लवकर पोहोचते त्यामुळे तिचे पैसे तिप्पट आहेत..... पण बस 
तेवढेच अन्तर तेवढ्याच कम्फर्टने १०/१५ मिनिटे जास्त घेऊन पार पाडते इतकच " 
त्यामुळे बसनेच चल " असा प्रेमळ सल्ला देत, तिने मला माझा उतरायचा थांबा ही दाखवला 
आणि "एकटी फिरते आहेस तर थंडीमध्ये काळजी घे" असे प्रेमाने सांगत उतरली! बसमधून
 दिसणारे सुरेख रस्ते, शिस्तीत पाळली जाणारी lane system, रस्त्याच्या कडेला फुललेली 
tulips, daffodils, lilies… सगळंच इतकं टापटीप आणि मनोहारी वाटत होतं की डोळे सतत
 खिडकीबाहेरच खिळले होते.

रस्त्याच्या कडेला बहरलेले विविध रंगी फुलांचे सुबक ताटवे ...

वल्लभने सांगितलं होतं — “सेंट्रल स्टेशनवरून चालत १५ मिनिटांत तुझं हॉटेल येईल.” 
त्यामुळे उतरल्यावर गूगलेश्वराच्या मदतीने सामान सावरत चालायला सुरुवात केली… 
पण थोड्याच वेळात जाणवलं की हा रस्ता “१५ मिनिटांचा” नसून “जीवनातील निर्णयांवर 
पुनर्विचार करायला लावणारा” आहे 😄 चढ-उतार, जड बॅगा आणि jet lag… ह्यांनी मिळून 
माझी व्यवस्थित परीक्षा घेतली. शेवटी १० मिनिटांनी एका टॅक्सीला हात केला. मनात म्हटलं — 
“होऊ देत खर्च!” 😄 “अभी तुम ही मेरे सारथी…” असे पार्थासारखे भाव चेहऱ्यावर घेऊन 
मी पत्ता दाखवला आणि त्या ड्रायव्हरनेही त्याचं “सुदर्शन चक्र” — म्हणजे सुकाणू — हाती घेतलं
 आणि मला सुखरूप हॉटेलवर पोहोचवलं. हॉटेलमध्ये check-in केल्यावर मात्र जाणवलं — 
भारतीय हॉटेलमधला पाहुणचार खरंच वेगळा असतो. इथे म्हणजे कार्ड घ्या, तुमची रूम शोधा, 
सामान घेऊन जा… बस्स! ना “कुठून आलात?”, ना “प्रवास कसा झाला?” ना उगाच गप्पा! 
आपल्याकडे रिसेप्शनवरच अर्धा emotional सपोर्ट मिळतो 😄 रूममध्ये शिरले… 
आणि का कोण जाणे अचानक रडूच कोसळलं...... 'कोण्या काळचे पाणी डोळ्यात येते " अशी
 अवस्था झाली होती.. Gen Z च्या भाषेत सांगायचं तर — “ Solo travelling चा Reality Check!”
 माझच मनच मला चिडवू लागलं — “फारच गमजा मारत होतात मॅडम… एकल प्रवास म्हणे! 
आता जरा acidity झाली तर नवरा-मुलगा सगळे आठवले ना? 😒 अरे अभी तो शुरुआत है… आ
गे आगे देखो होता है क्या!” 😄 थोड्या वेळात जरा हुशारी आल्यावर म्हटले, 
“चल… आधी फ्रेश होऊ.” बॅग उघडली आणि श्रद्धाने आग्रहाने दिलेले मेथीचे ठेपले 
आणि गुळाची पोळी दिसली… आणि अचानक एक उबदारपणा मनात पसरला. त्या क्षणी जाणवलं —
 एकटा प्रवास करत असलो तरी आपण पूर्ण एकटे नसतोच… “मेरे साथ चलती है सबकी परछाई…” ❤️ 

स्टॉकहोम चे कुंद वातावरण.... 

मग,मस्त आवरून ठेपले खाल्ले आणि गरमागरम कॉफी प्यायले. 
जरा चित्त प्रसन्न झालं. असंच असतो सोलो ट्रैवल बहुतेक….. जरा तोल जातोय असं वाटलं की 
आपणच आपल्याला हात द्यायचा… आणि आपणच स्वतःला सावरायचं. मनात म्हटलं — 
“चला प्रगती मॅडम… आता खरा एकल प्रवास सुरू झाला तुमचा…” 
आणि मग मनात अलगद उमटलं — 
“जोदि तोर डाक शुने केउ ना आशे तौबे ऐकला चौलो रे। 
ऐकला चौलो, ऐकला चौलो, ऐकला चौलो, ऐकला चौलो रे!…” ❤️

Comments

  1. Sharvari TathavadekarMay 19, 2026 at 9:44 PM

    वा.. सगळ्या भावना अगदी जशाच्या तशा पोचल्या... खूप सुंदर लिहिले आहेस..!❤️

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ♥️

      Delete
  2. धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  3. जीवनातील निर्णयांवर पुनर्विचार 🤣🤣🤣🤣🤣

    ReplyDelete
  4. Replies
    1. प्रगतीMay 28, 2026 at 8:26 PM

      धन्यावाद 🙏

      Delete
  5. वाह वाह... ते आई मुलाचे क्षण खूप छान मांडलेत, solo travelling mhanje एकल प्रवास आणि स्व चा शोध, mast

    ReplyDelete
    Replies
    1. प्रगती जोशीJune 15, 2026 at 6:16 AM

      😊😊...थँक्स!! खरच आपल्यामध्ये असलेल्या काही गुणांचा [ अवगुणांचा सुद्धा 😛] शोध लागला!! 😊😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्र चा एकल प्रवास....

प्र चा एकल प्रवास....पॅलेस,नोबेल प्राईझ म्युझियम, निळाई आणि मी!!