प्र चा एकल प्रवास....पॅलेस,नोबेल प्राईझ म्युझियम, निळाई आणि मी!!
संध्याकाळी उशीरा पोहोचल्यामुळे गूळपोळी आणि मेथीचे ठेपले खाऊन, वर गरम कॉफी पिऊन मी अशी काही निद्राधीन झाले की jet lag पण म्हणाला असेल — “हिला disturb करणं आपल्या बसचं नाही!” 
दुसऱ्या दिवशी उठले तर एकदम fresh वाटत होतं… आणि पुढच्याच क्षणी वास्तवाने कानाखाली वाजवली — “मॅडम, आजपासून खरी परीक्षा आहे!” कारण इथलं sightseeing काय करायचं, कुठे जायचं, कसं जायचं… याचं काहीच ठोस planning नव्हतं. आपल्या “गूगलेश्वराने” सुचवलेली काही ठिकाणं मात्र भक्तिभावाने note करून ठेवली होती. पण बाकी पूर्ण मामला “जाऊ तिथे रस्ता शोधू ” category मधला होता. 
मग मनाशी ठरवलं — “नाश्ता करू, लोकांना विचारू आणि दिवसाचा रूट ठरवू…” आणि तयार होताना स्वतःलाच background music दिलं —
“अभी तो adventure शुरू हुआ है!” 

नाश्त्याला अर्थातच थंड पदार्थांची मैफल सजली होती. क्रॉसाँ [ज्याचा उच्चार करताना आपली जीभ आणि आत्मविश्वास दोन्ही घसरतात
], केक, उकडलेली अंडी, scrambled eggs, चिकन, फळं, ब्रेड-बटर-जॅम, सुका मेवा… आणि कॉफीचे तीन-चार प्रकार.....कॉफी मात्र स्वतः बनवायची होती. आपल्या इथल्या सारखे नाही ....मशीनसमोर उभी राहिले तेव्हा दोन सेकंद मला वाटलं — “ही कॉफी मशीन आहे की एखाद्या रॉकेट चे control panel?” 

], केक, उकडलेली अंडी, scrambled eggs, चिकन, फळं, ब्रेड-बटर-जॅम, सुका मेवा… आणि कॉफीचे तीन-चार प्रकार.....कॉफी मात्र स्वतः बनवायची होती. आपल्या इथल्या सारखे नाही ....मशीनसमोर उभी राहिले तेव्हा दोन सेकंद मला वाटलं — “ही कॉफी मशीन आहे की एखाद्या रॉकेट चे control panel?” 

त्यातल्यात्यात काहीतरी खाल्लं आणि reception वर ट्राम-मेट्रोची माहिती घेऊन स्टेशनकडे निघाले.
युरोपमध्ये स्वतः च स्वतः public transport वापरण्याची माझी ही पहिलीच वेळ… त्यामुळे चेहऱ्यावर confidence होता, पण आतून आत्मा सतत म्हणत होता —
“देवा, चुकीच्या ट्रेनमध्ये बसून सरळ दुसर्याच दिशेला पोहोचू नको बस!” 

स्टेशनवर help window ला गेले. तिथल्या व्यक्तीला मी मला कुठे कुठे जायचं आहे ते दाखवलं आणि म्हटलं, “ह्या सगळ्या जागी जायचे तिकीट द्या…”
तो माझ्याकडे आणि map कडे आलटून पालटून बघू लागला. बहुतेक त्यालाही जाणवलं असेल —
“ही बाई आज पूर्ण स्टॉकहोम पालथं घालायच्या mood मध्ये दिसतेय!” 

मग त्याने अगदी शांतपणे सगळं समजावलं — कुठे उतरायचं, कुठे ट्राम बदलायची, दुसरं तिकीट कुठे काढायचं… इतकंच नाही तर पूर्ण रूट मोबाईलवर दाखवून ट्राम नंबर, प्लॅटफॉर्म नंबर दाखवून त्याचा फोटोही काढून घ्यायला लावला. आणि शेवटी हसून म्हणाला —
“जर हरवल्यासारखं वाटलं तर असे jacket घातलेल्या लोकांना विचार… ते नक्की मदत करतील. And all the best for your adventure!” 



त्या क्षणी खरंच मन भरून आलं…..परदेशात, एकटी असताना, आपल्याला कुणीतरी इतक्या शांतपणे मदत करतं ना… तेव्हा नकळत धीर येतो. आणि त्याच बरोबर मनात अजून एक विचार चमकून गेला —आपल्याकडे रेल्वे स्टेशनवर एखादा सरकारी कर्मचारी इतक्या प्रेमाने, संयमाने बोलला तर…
तिकीट घेण्याआधीच आपण त्याला “दादा, तुमच्यासाठी घरून गूळपोळी आणू का?” असं विचारू! 



अंडरग्राउंड प्लॅटफॉर्मवर आले आणि डिस्प्ले बोर्डवर कुठली मेट्रो येते आहे ते पाहिले....तिथे स्वीडिश भाषेत आणि इंग्रजी मध्ये दोन्ही भाषेत नावे दिसत असल्यामुळे कळत होते.
आलेल्या मेट्रो मध्ये चढले आणि मला जायच्या असलेल्या स्टेशनवर उतरून बाहेर आले.
Gamla Stan हा जुन्या स्टॉकहोमचा भाग मानला जातो. [रेल्वे स्टेशन वरून तर बराच अत्याधुनिक वाटला] . इथून स्टॉक होमच्या ठरविक विविध रंगी इमारती, alleyways [ छोट्या अरुंद वाटणार्या गल्ल्या], पेव्ह्ड रोड- उंच सखल रस्ते, रस्त्याच्या फुलांच्या फळांच्या विक्रीसाठी कडेला लावलेले आकर्षक स्टॉल्स आणि तरीही कमालीची स्वच्छता ह्यांनी त्या निमुळत्या रस्त्यांना वेगळेच सौंदर्य दिले होते. तिथे असलेल्या लोकांशी उगाचच गप्पा मारल्या आणि मग माझ्या पहिल्या स्थळावर जायला निघाले.
गूगलेश्वर त्रास देणाऱ्या मित्रासारख उलटे सुलट फिरवू लागला....आणि माझ्या चेहर्यावर चक्रव्यूहात असलेल्या अभिमन्यूचे भाव जमा होऊ लागले.....जॅकेट वाले लोक शोधायला लागले तर दोन पोलीस मला समोर दिसले....लेडी पोलिस फोनवर बोलत होती. तिच्यासाठी तिथेच कडेला थांबले तर तिथे असलेला दुसरा पोलिस माझ्याजवळ आला आणि अत्यंत प्रेमाने त्याने मला विचारले, "Are you waiting for her? Let me know if I can help you!". एकतर इतका देखणा,[खूपच जास्त देखणा होता...एखाद्या इंग्रजी चित्रपटात काम करणाऱ्या हीरो सारखा] आणि सभ्यतेने वागणारा पोलिस मी फक्त सिनेमामध्ये पहिला होता....आणि त्यात इतक्या प्रेमाने त्याने विचारल्यामुळे मी पूर्ण मंत्रमुग्ध का काय म्हणतात तशी झाले....त्याने मला परत विचारले,"Any problem?". मी लगेच त्याला, मला जायची जागा दाखवली आणि म्हटले,"गूगल मुळे मी खूप वेळ गोल फिरते आहे."
तो हसला म्हणाला," इथे गल्ली बोळात गोल घुमवतो तो. मी सांगतो तुला....ह्या उजवीकडच्या गल्लीतून सरळ 300 मीटर जा....तिथून डावीकडच्या गल्लीतून अजून 350/400 मीटर जा.... मोठी कमान लागेल...तिथून उजव्या बाजूच्या एकदम निमुळत्या गल्लीत जा....ती गल्ली ज्या square[ चौक] मध्ये पोहोचेल तिथे आहे तुझे destination. ...
आणि काही वाटले तर इथेच परत ये आम्ही परत मदत करूच. "
इतक्या बारकाईने सांगितलेल्या पत्त्या मुळे बिशाद माझी मी चुकेन रस्ता....मी अगदी वेळेत नोबेल प्राईझ म्युझियमच्या समोर जाऊन पोहोचले. ११ च्या ठोक्याला दरवाजा उघडला आणि दरवाज्यातून आत गेल्यावर काऊंटर वरून तिकीट काढले आणि तिथल्या गाइडने विचारले,"Do you want a guided tour inside the museum - in English?"
अतिशय सावधपणे उत्तरं देत मी तिला विचारले, " Will it cost me extra?" [ मी पक्की भारतीय, त्यात पुणेरी आणि पेशाने शिक्षक त्यामुळे दक्षतेने आधीच हा प्रश्न विचारला] तिने लगेच सांगितले,"No it's exclusively included in the tickets - as you are a foreigner!"
[मनात म्हटले चला आता माहिती ही नीट कळेल आणि वर ग्रुप मधल्या बाकीच्या लोकांबरोबर गप्पा पण होतील.]
स्वीडनमधील स्टॉकहोम नोबेल पारितोषिक संग्रहालयात, नोबेल पारितोषिक विजेत्या ९०० हून अधिक सर्जनशील व्यक्तींच्या कल्पना, शोध आणि वैयक्तिक कथा प्रदर्शित केल्या आहेत. हे ऐतिहासिक ओल्ड टाऊन (गाम्ला स्टॅन) मधील मुख्य चौक, स्टोर्टोर्गेट येथील पूर्वीच्या स्टॉक एक्सचेंज इमारतीत वसलेले आहे. नोबेल पारितोषिकाच्या शताब्दीनिमित्त, २००१ साली जुन्या शहरातील स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये नोबेल पारितोषिक संग्रहालय उघडण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेत्यांनी दान केलेल्या वस्तू, ज्या विविध मार्गांनी त्यांच्या कथा सांगतात, त्यांनी गेल्या काही वर्षांत ह्या प्रदर्शनांना समृद्ध केले आहे. २०२४ मध्ये, 'जगाला बदलणाऱ्या वस्तू' नावाचे एक नवीन मुख्य प्रदर्शन सुरू झाले, ज्यात यापैकी बहुतेक वस्तू प्रथमच एकत्र प्रदर्शित करण्यात आल्या. [आणि ते बघण्याचे भाग्य माझ्या नशिबात होते असे वाटत राहिले.] मॅडम क्यूरीपासून आताच्या मलाला पर्यन्त अनेक नोबेल प्राइस मिळालेल्या लोकांच्या वस्तू त्यामागच्या गोष्टी त्या वस्तूंचे महत्व अश्या अनेक गोष्टी अतिशय रंजक पद्धतीने आमची गाइड सांगत गेली आणि विशेष म्हणजे अमेरिकन, पॉलिश, भारतीय [अर्थातच अस्मादिक] जर्मन अश्या वेगवेगळ्या भाषेतून देशातून आलेल्या लोकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे ही दिली!!
![]() हीच आमची गाइड - अस्खलित इंग्रजीमध्ये, रंजक पद्धतीने वस्तूंचे आणि ती देणाऱ्याचे शोधांचे महत्व सांगणारी! |
| अस्मादिक - नोबेल साहेबांबरोबर ! |
बरीच महिती दिल्यावर तिने अर्थातच संग्रहालय आमचे आम्हालाही बघायला मोकळीक दिली.
तिथे दोन अडीच तास कसे गेले कळले ही नाही आणि मी तिथून बाहेर पडून माझ्या पुढच्या स्थळाच्या दिशेने [अर्थातच चालत चालत] मार्गक्रमण करू लागले . स्टॉकहोममधील राजवाडा हे राष्ट्रप्रमुख, महाराजांचे अर्थातच अधिकृत निवासस्थान आहे. येथेच राष्ट्रप्रमुख, त्यांना त्यांच्या कर्तव्यात साहाय्य करणाऱ्या उर्वरित राजघराण्यासोबत, आपली घटनात्मक, शासकीय आणि अधिकृत कर्तव्ये पार पाडतात. तिथे आत जाऊन काही महत्वाच्या खोल्या आणि संग्रहालय बघता येते. पण मी पोहोचले तेव्हा तिथे “Change of Guards” चा समारंभ सुरू होता.
हा प्रकार आम्ही Buckingham Palace [इंग्लंड] मध्ये आणि Gyeongbokgung Palace [साऊथ कोरिया] मध्येही पाहिला होता… त्यामुळे “अरे वा, आपल्या royal syllabus मधला हा chapter ओळखीचा आहे!” असं वाटलं. 

थोडेफार फरक होतेच… पण तीच शिस्तबद्ध हालचाल, सुरेल बँड आणि मुख्य म्हणजे सूर-तालाचा जबरदस्त मेळ! प्रत्येक देशात बँडचे सूर वेगळे असले तरी त्या समारंभाची रुबाबदार चाल मात्र सारखीच — अगदी “discipline with melodious background music!” अशी!
त्या सगळ्या वातावरणामुळे संपूर्ण राजवाड्याला एक वेगळीच दिमाखदार शोभा आली होती.
पॅलेसच्या पटांगणात लोक फोटो काढण्यात इतके गर्क होते की मला क्षणभर वाटलं — इथे guards पेक्षा tourists चीच parade जास्त चालू आहे! 

पण माझं मात्र पूर्ण लक्ष आता पोटाकडे वळलं होतं… कारण भूक अगदी राष्ट्रगीतासारखी मनात जोरात वाजायला लागली होती!
जवळच समुद्राचं निळंशार पाणी चमकत होतं… वर सीगल पक्षी मस्त फेर्या मारत होते… आणि इतक्या दुपारी, उन्हामध्ये ही थंड वाऱ्यामुळे आणि गार वातावरणामुळे एक शांत, सुंदर निवांतपणा पसरला होता.म्हटलं, “चला प्रगती मॅडम, आधी किनाऱ्यावर बसून सॅकमधला खाऊ संपवू… मग पुढे जग जिंकायला [फिरायला] जाऊ!” 

राजवाड्याकडून किनाऱ्याकडे येताना दोन मध्यमवयीन स्त्रिया दिसल्या. चेहऱ्यावरून भारतीय वाटल्या म्हणून धाडस करून विचारलं, “Are you Indian?”
दोघींनी एकदम वळून पाहिलं आणि एका सुरात, “Yesss!” 

मग माझ्यातली भारतीय गुप्तचर यंत्रणा लगेच जागी झाली —
“कहाँ से हैं आप?” मनात वाटलं होतं… आता हिंदीत गप्पा रंगतील… तर त्यातली एक म्हणाली, “मैं केरला से हूँ…”
आणि दुसरी लगेच म्हणाली, “मी मुंबईची…”.... बस्स!
क्षणात आम्ही तिघीही एकदम मोकळ्या झालो.
परदेशात अचानक आपल्या भाषेचा आवाज कानावर पडला की मनाला जी उब मिळते ना… ती शब्दांत सांगणं कठीण आहे.
त्या क्षणी समुद्राचा निळेपणा, राजवाड्याची भव्यता, सीगल्सची उडणारी रांग… सगळं सुंदर होतंच — पण “अगं, तू पण आपल्या मातीचीच!” ही भावना मात्र सगळ्यांत जास्त सुंदर होती. 

त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी कुठे जावं याची चौकशी केली.
त्यांनी सुचवलेल्या जागा माझ्याही मनात होत्याच… त्यांनी जणू त्या विचारांवर शिक्कामोर्तबच केलं.
आणि मग मी निवांत चालत राहिले…अगदी —
“जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा…
न कुठले नकाशे… न अनुमान काही…”
तशीच.
कुठलीच घाई नाही… कुठलंच destination डोक्यात नाही…
म्हातारीचा केस जसा वाऱ्यावर स्वतःच्या तालात तरंगत राहतो, तसं मनही त्या समुद्रकिनाऱ्यावर मुक्त भटकत होतं.
समोर अथांग निळाई…
वर आकाशाची… खाली समुद्राची…..आणि मध्ये मी — हळूहळू त्या निळाईत विरघळत जाणारी.!!
पर्वतांची दिसे दूर रांग......काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे.....भोवती सावळ्या चाहुली...
का कोणास ठाऊक पण सुधीर मोघेंची ही कविता गुणगुणत होते..
पुढचा एक तास मी फक्त समुद्राकडे बघत राहिले…
लाटांच्या आवाजात स्वतःचेच विचार विरघळताना ऐकत राहिले.
कधी चालत… कधी थांबत… कधी फक्त श्वास घेत.
मग एका एकाकी बाकड्यावर जाऊन बसले. समोरचा रस्ता…....येणारी-जाणारी माणसं…..प्रत्येक जण कुठल्यातरी घाईत… कुठल्यातरी शोधात असल्यासारखे होते...
..बरोबर आणलेलं खाल्लं… पाणी प्यायले… आणि मग निश्चल बसून राहिले. त्या क्षणी जाणवलं —
शांतता ही बाहेर कुठेच नसते…..ती आपल्या आत हळूहळू उगवत जाते. दररोजच्या घाईगर्दीत आपण किती हरवून जातो नाही? सतत कुठेतरी पोहोचायचं असतं… कुणासाठी तरी काहीतरी करायचं असतं…पण स्वतःसोबत काही क्षण फक्त शांत बसायचं… हेच राहून जातं......त्या दिवशी मात्र वेळ थांबला होता…आणि मीही.
ना फोन… ...ना घाई…...ना कोणाला काही सिद्ध करायचं…
फक्त समुद्र…...ती निळाई…...
आणि मनात हळूहळू उतरती शांतता…!!
काही क्षण असे असतात…
जे जगले जात नाहीत….ते फक्त मनात कायमचे साठून राहतात..!
ह्या आत्मनिरीक्षणाच्या क्षणानंतर मी माझ्या हॉटेल वर परत आले....रात्रीचे ८ वाजत आले होते आणि अजून तिथे संध्याकाळचा प्रकाश होता....वार मात्र झोंबायला लागले होत.
हॉटेल वर थोडी फ्रेश झाले आणि समोरच्या McDonald’s मध्ये थोडे खाऊन.....आजच्या समुद्री क्षणांची आठवण काढत निद्रादेवीच्या स्वाधीन झाले....
.jpeg)


.jpeg)
वा.. खूपच सुंदर.. तुझ्या आवाजात ऐकतेय असं वाटलं! 👌👌
ReplyDeleteएकदा वाचून दाखवेन....आवडेल मला!!😊
Deleteखरंच मज्जा येईल तुझ्या तोंडून ऐकायला
Deleteनक्की ऐकावेन!! पुढच्या वेळी भेटू तेव्हा!!
Delete☺️मनापासून आभार 🙏
ReplyDeleteसुंदर वर्णन!
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम लिहितेस गं 💖
ReplyDeleteएका लेखिकेने केलेले कौतुक खूप भारी वाटले मला 🙏
Deleteअग तू नोबेल म्युझियम पाहिलास! किती भारी वाटलं.आणि तुझ्या सर्व प्रवासाच वर्णन वाचून तुझं कौतुक मनात दाटून आलं.परदेशात एकल प्रवास जरी सोपा म्हणजे धोके विरहित असेल तरीही तो करण्याचं धाडस करत तू दाखवलेली धडाडी वाखाणं मला आवश्यक वाटतं आहे.ग्रेट!!
ReplyDeleteमिळालेल्या संधीच सोन केलेस.
Proud of you!!
मनापासून धन्यवाद मावशी!! खरं म्हणजे खूप भीती वाटली होती जाताना...पण मला खूप शिकवले ह्या एकल प्रवासाने.....खूप आत्मविश्वास मिळाला ☺️
Deleteखूप छान.. समुद्र, निळाई आणि शांतता 👌🏻👌🏻
ReplyDeleteहो....तुला तर खूप फोटो..चित्र काढावीशी वाटली असती.....कारण त्या निळ्या वातावरणाचे वर्णन करणे शब्दात शक्य वाटत नाही....त्यामुळे निळाई.... शांतता अनुभवलेली हे खरं!!
Deleteआभार...तुला तर तिथे खूप लैडस्केपस काढावीत असे वाटले असते. ..
Deleteवा, छान खुसखुशीत पण तपशीलवार वर्णन, तुम्हाला 'एकल' ऐकलं , पण आपणही बरोबर आहोत असं फीलिंग आलं काही काही ठिकाणी....मस्त एन्जॉय केलंत...
ReplyDeleteअरे वाह! अजून एका लेखकाकडून कौतुक!! मनापासून आभार 🙏
Deleteधाडसी धन्नो
ReplyDelete😅आज धन्नो आहे का मी?!!
Deleteपुढचा भाग??
ReplyDeleteपाठवलाय मॅडम 🙏
Deleteहे वाचणे म्हणजे प्रत्यक्ष प्रवासात असल्यासारखेच आहे.
ReplyDeleteमाझ्या एकल प्रवासात सहप्रवासी झालात तुम्ही!
Delete