प्र चा एकल प्रवास....Mamma Mia, Vasa Museum, Wanderlust!!
Mamma Mia, Vasa Museum, Wanderlust!!... घर सोडून आता तीन दिवस झाले होते…आणि खरं सांगायचं तर वल्लभ आणि असीमचे दिवसातून होणारे video calls हे माझ्या मानसिक Wi-Fi चे hotspot झाले होते. “तू ठीक आहेस ना?”, “जेवलीस का?”, “रस्ता सापडला ना?” — ह्या प्रश्नांनी जरा धीर यायचा…[पण वरकरणी मी त्यांना राग आलाय असेच दाखवायची ] किंवा कदाचित मीही आता हळूहळू “एकटीने फिरणारी बाई” ह्या नव्या version मध्ये update होत होते. पण आज सकाळ काहीतरी वेगळीच उजाडली होती… कालपर्यंत “अगं हे स्टेशन बरोबर आहे ना?”, “ही ट्राम कुठे जाईल आता?” असे प्रश्न मनात घोळत होते… आणि आज मात्र उठल्यावर एकदम शांत वाटत होतं. जणू मनानेही स्वतःची आता suitcase उघडून व्यवस्थित settle व्हायचं ठरवलं होतं. भीतीचा jet lag उतरला होता बहुतेक…..कारण आज पहिल्यांदाच “आपण इथे manage करू शकतो” हा विचार मनात अगदी सहज येऊन गेला. मग काय… एकदम आत्मविश्वासाने latte वगैरे प्रकार करून प्यायले. बेक्ड बीन्स मस्त टोस्ट केलेल्या ब्रेड वर घेतले, salad ला चवीचे dressing घातले, frui...